उभी होते दारात एकटक शून्यात पाहत... जशी जशी ट्रेन पुढे जात होती तसे तसे माझे नवीन नवीन शून्य नीर्माण होत राहीले... माझ्या नजरेच्या टप्प्यात येण्यासाठी॥
कधी parle-g ची building, कधी काही ओळखीच्या दूकानांच्या पाट्या........ बस काहीही माझे शून्य व्यापणारे.....
सगळे दीसत असून कशाचीही फर्शी जाणीव होत न्हवती कदाचीत
अचानक ट्रेन थांबली ....... आणी शून्य सुद्धा .....
..............
एका पींपळाच्या झाडावर थांबले शून्य
पानाची सळसळ ...
काळ्याभोर आकाशातले नाजुक थेंब स्वताच्या पदरात घेणारी पाने ....
वार्याशी खेळणारी......
स्वताकडे ओढून घ्यावे ते झाड़ ......
असे वाटत राहीले... अचानक पाऊस सूरू झाला... ...
सगळे थेंब तोंडावर ओझरले.....
भीजवले मला ......
खूप वेळापासून इतरांशी काहीही देणे- घेणे नसलेली मी, अचानक जागी झाले॥
कूणीतरी मोबाइल वर गाणे लावले होते.... माझ्या कानांनी ऐकले असावे माझी परवानगी न घेता.... :(
"लग जा गले की फीर ये , हसीं रात हो ना हो
शायद फीर इस जनम में , मुलाकात हो ना हो॥"
आणी मग मघापासून पावसाच्या पाणयापासून माझ्या पापणयांनी संरषण केलेले डोळे स्वतःच ओले झाले
तेही अचानकच.....
आणी मग...
चेहर्या वरून वाहणारे पावसाचे पाणी की डोळ्यातले
आलेला कढ.... गाण्यामूळे की मनातला, वारा वेगाने वाहतोय की माझे मन ........... हे प्रश्न पडत राहीले....
ट्रेन परत सूरू झाली॥
पण आता बाहेर पहायचे न्हव्ते.....
आता 'आत' थोड़े वाकून पहायची गरज होती................
2 comments:
तुझ article आज वाचल. त्या दिवशी फ़क्त कविताच चाळली होती. आज पुन्हा तुझी ही कविता उघडली, कारण माझी उत्तराची सुचलेली कविता post करायची होती. त्यामुळे तुझी कविता पुन्हा वाचली. आणी ते article ही.
कविता नीट कळली ते वाचल्यानंतर. सुमारे १२-१५ वर्षांपूर्वी मी तुझ्या एव्हढाच होतो. माझा मीच मलाच सापडलो, आथावालो, गवासलो. खुप खुप काळानंतर. गळा भरून आला.
तुझा अनुभव, त्या अनुभवातील उत्कटता, अनुभवातून उमटणार एक खोल पण नितळ मन. अस की जे एका छोट्या भावुक स्पर्शानही चाळवाव. त्यावर तरंग उठावेत. केव्हाही त्याला भावनांचे तरंग यावेत.
नाही ग, ते वादळ नव्हतं, वादळ फार वाईट असतात.
ते तरंग होते, एक सुंदर, खोल, नितळ आणी शांत मनावरती उमटलेले. एकाच हलाक्याश्या वा-याच्या झुळकीने.
एक सुंदर भावविश्व उलगडून दाखवलस, ज्यात एक अनुभवाचा जीवन्तपणा आहे, हळवेपणा आहे........................................................ माझ्या शब्दांना अंत नाहिये, म्हणून हां fullstop.
हर्षदा, सुंदर लिहिलयस.
पावसाचे असे भुरे थेंब आत जातात, आतल्या मातीला भिजवतात आणि मृदगंध घेऊन पुन्हा बाहेर येतात. बाहेर येऊन काय सांगतात ग ते तुला.... ?
Post a Comment