Wednesday, July 30, 2008

break off

चल मग नीघतोयास ना तू?
घे बघू आवरायला !!
बँगेत भर एकेक करून
तूझे वीचार,
तूझं संगीत,
तूझे रंग-कूंचले चीत्र !
तूझं असं 'सगळं'
माझ्या पदरात दडलेलं
अगदी तूझं 'असणं' सूदधा

मग नीरोपाची भेट म्हणून,
काय देणार आहेस मला?
की,आजसुदधा नेहमीसारखं,
मीच मागू स्वत:च्या तोँडाने?
", वीस्म्रुतिंचे वरदान देशील?
नाही, नको म्हणू नकोस ,
कारण तूलाच जमेल ते फक्त!"
परमेश्वरालाही जमणार नाही
कदाचित....

मी सांगू काय देणार तूला,
वचन देणार एक
अनंताला जायची वेळ येइल ना,
तेव्हा मीच जाईन आधी
सारखं मीच काय म्हणून वाट पाहायचं?

i'm not just myself ... HE is in me

somewhere inside..............

HE reflects himself from my poems, paintings, my whole 'being'...
what if HE just leaves???
will i be the 'same' without him??

1 comments:

Anonymous said...

fantastic